गुन्हेगारी

हद्दपार कालावधीमध्ये विनापरवाना वास्तव्य करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 23 जुलै :पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, प्रकाश मांडगे, प्रदिप शेळके यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले इसम चेक करुन ते मिळुन आल्यास त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सदर पथकास आदेशीत केलेले होते.
वर नमुद पथक हे अहिल्यानगर शहरात हद्दपार करण्यात आलेले इसम चेक करत असतांना पथकास दिनांक 22/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत हद्दपार करण्यात आलेला इसम करण खंडु पाचारणे हा एम.आय.डी.सी. परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर प्राप्त माहितीनुसार सदर इसमाचा शोध घेत असतांना तो गांधीनगर, बोल्हेगांव, ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव करण खंडु पाचारणे वय 32 वर्षे,  रा. आदर्शनगर, नागापुर, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्यास मा.उपविभागीय दंडाधिकारी अहिल्यानगर भाग अहिल्यानगर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातुन 6 महिण्यांकरीता हद्दपार केलेले असल्याचे निष्पन्न झाले. 
मिळुन आलेल्या इसमांविरुध्द पोकॉ/2520 प्रकाश नवनाथ मांडगे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 616/2026 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे