ब्रेकिंग

झुरळांच्या ताकतीपुढे केंद्र सरकार नमले, अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा! लोकशाहीचा विजय!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : नवी दिल्ली : दि.25 जुलै 2026 झुरळांच्या ताकतीपुढे केंद्र सरकार नमले असून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याच्या चर्चा भारतभर नागरिकांमधून होत आहेत.गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
गेल्या काही काळापासून शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावरून विरोधकांकडून सतत टीका होत होती, तसेच नीट पेपरफुटी प्रकरण आणि विविध परीक्षांमधील गोंधळाच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती.
कॉक्रोच जनता पार्टीकडून प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण, आंदोलन सुरू केले होते. अखेर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे