गुन्हेगारी

महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे आरोपी तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 16 जून : सविस्तर हकीगत अशी की, यातील पिडीत महिला हि दिनांक 10/06/2026 रोजी रात्री 10/30 वा.चे सुमारास सिध्दार्थनगर येथील राहत्या घरी तिच्या पती व मुलासह घरात झोपलेली होती. तिस दि.11/06/2026 रोजी मध्यरात्री 12/30 वा.चे सुमारास पिडीत महिलेस तिच्या घरासमोरील ओट्यावर काही तरी पडल्याचा आवाज आल्याने पिडीताने घराचा दरवाजा उघडुन पाहिले असता दारामध्ये एक कागदी मोरपंखी रंगाचा बॉक्स पडलेला होता. यातील पिडीत महिला व तिच्या घरातील सदस्यानी सदरचा बॉक्स उघडुन पाहीला असता त्यामध्ये एक रबरचे मानवी कृत्रिम लिंग आढळुन आले म्हणुन यातील फिर्यादी यांना लज्जा उत्पन्न झाल्याने त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. 479/2026 , भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79, 3(5) प्रमाणे दिनांक 13/06/2026 रोजी 03/01 वा.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी गुन्ह्याची माहिती घेवुन सदरचा गुन्हा हा स्री अत्यारासंबधीत असल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना आरोपीचा शोघ घेण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याअनुषंगाने लागलीच पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी 1) विनोद मधुकर त्रिभुवन, वय 43 वर्षे, रा.सिध्दार्थनगर, म्युन्सीपल कॉलनी, अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार (2) हर्ष सुनिल शेलार, (वय 18 वर्षे), (3) विधीसंघर्षीत बालक सर्व रा.सिध्दार्थनगर, मुन्सिपल कॉलनी, अहिल्यानगर*यांच्या सोबत केल्याचे सांगितले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.फौ गोपीनाथ गोर्डे हे करत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.मुम्मका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी वैद्य, तोफखाना पो.स्टे अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, नितिन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे, पो.कॉ सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतिष शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, म.पो.ना जिजा खुडे, म.पो.कॉ कल्पना अवसरे, सर्व नेमणुक तोफखाना पो.स्टे, अहिल्यानगर यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे