देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :बीड जिल्हा (प्रतिनिधी– गोरख मोरे) :
शिरूर कासार ( जिल्हा बीड) तालुक्यातील रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या आरोग्य सुविधेचा पुरता बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या गलथान,ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र सत्य समोर आले . या रुग्णालयातील गैरसोयींबाबत अनेक तक्रारी प्राप्त होताच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे/ उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी रुग्णालयातील ‘अंधाधुंद’ कारभार पाहून त्यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला असून या ठिकाणी
पाणी नाही, फॅन नाही; रुग्णांचे प्रचंड हाल,रुग्णालयातील पाहणी दरम्यान विदारक आणि सत्य चित्र असे दिसून आले की, अनेक वार्डमध्ये साधे फॅन देखील सुरू नाहीत. कडाक्याच्या उन्हात रुग्ण घामाघूम झाला असून पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना जेवणानंतर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून रुग्णालयात कुलर आहे मात्र ते केवळ नावापुरतेच असून त्याचा वारा मोजक्याच पेशंटपर्यंत जातो . रात्रभर डासांचा प्रादुर्भाव असल्याने पेशंटना झोपणे कठीण झाले असुन तिथे साधी मच्छर अगरबत्तीही उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले .
मेंटेनन्सचा पैसा जातो कुठे?
रुग्णालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी (Maintenance) शासनाकडून मोठा निधी येतो, मग हा पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्न सोपान (काका ) मोरे / आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी उपस्थित केला . रायमोहा परिसरातील ८ ते १२ वाड्यांमधील नागरिक उपचारासाठी येथे येतात. रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून प्रथमोपचारासाठीही रुग्णांना ताटकळत राहावे लागते .
जिल्हाप्रमुख उल्हासभैया गिराम यांचा इशारा–
”रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे होत असलेले हे हाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कधीही सहन करणार नाही. जिल्हाप्रमुख उल्हासभैया गिराम यांच्या आदेशानुसार आज मी याठिकाणी पाहणी केली असून या बेशिस्त कारभाराला सर्वस्वी येथील वैद्यकीय अधीक्षक (MS) जबाबदार असून, त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची (Suspend) कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी सोपान (काका )मोरे /शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी केली .
रुग्णालयातील ही परिस्थिती लवकरात लवकर न सुधारल्यास शिवसेनेच्या स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला. या पाहणी दौऱ्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा