देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 13 जुलै : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातून मातंग समाजातील काही नेते आरक्षण उपवर्गी करण व्हावे याबाबत आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या मातंग समाजातील सुशिक्षित कार्यकर्त्यावंर आरक्षणाचे समर्थन करण्यासाठी जबरदस्ती करून दबाव तंत्र वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केडगाव येथील आंबेडकरी विचाराला मानणारे मातंग समाजातील सुशिक्षित कार्यकर्ते धनंजय पाचारणे यांनी याबाबत व्हिडीओ द्वारे माहिती देत आपल्या भावना व्यक्त करत आम्ही आंबेडकरी समुहा सोबत एकजुटीने आहोत असे म्हंटले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की,
केडगाव मध्ये काही दिवसापासून मातंग समाजाबाबत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. प्रभाग क्रमांक 15, 16, 17 मध्ये तो फक्त मातंग समाजाच्या लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी केला आहे. मात्र गेल्या ८ ते १० दिवसानंतर या ग्रुपवरती जबरदस्तीने आरक्षणाची चर्चा घडविली जात आहे. चर्चेला समर्थन
देण्यासाठी मातंग समाजातील आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या काही घटकांना जबरदस्ती केली जात आहे. याबाबत दबाव तंत्र वापरले जात असून आरक्षण उपवर्गीकरणाला समर्थन न दिल्यास त्या ग्रुपमधून काढले जात आहे . हा एक प्रकारचा समाजातून बहिष्कृत करण्याचा प्रकार तरुणांवरती घडत असल्याच्या प्रतिक्रिया केडगाव येथील आंबेडकरी विचाराला मानणारे धनंजय पाचारणे यांनी दिल्या आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा