देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज शांती रुग्णालयात जाऊन मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली.
मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून हा अपघात घडला होता.
यावेळी ना. रामदास आठवले यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच त्यांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा