गुन्हेगारी

तोफखाना हद्दीत चैनस्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आरोपीकडुन 1,32,190/-रु कि.चा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 13 जुलै : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/07/2026 रोजी सायंकाळी 05.00 वा.चे सुमारास   अज्ञात आरोपीताने त्यांचे ताब्यातील मोटार सायकलवर भरधाव वेगात फिर्यादीचे जवळ येवुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी मानसी जिवन महाजन रा. आनंत विहार, शिवम कॉलनी, तुळजा भवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर यांनि दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु. र. नं. 590/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, शाहिद शेख, विष्णु भागवत, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपी तत्काळ अटक करणे बाबत त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमुद पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत असतांना पथकास दिनांक 13/07/2026 रोजी सदरचा गुन्हा हा इसम नामे सागर रमेश नागपुरे रा. सावतानगर भिंगार, अहिल्यानगर याने केला असुन तो कोथरुड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ कोथरुड, जि.पुणे येथे जावुन शोध घेत असतांना एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव सागर रमेश नागपुरे वय- 33 वर्षे, रा. सावतानगर, भिंगार ता.जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
आरोपीचे कब्जातुन 62,190/- रु रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली 70,000/-रु कि.ची बजाज मोटार सायकल असा एकुण 1,32,190/-रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी सागर रमेश नागपुरे याचेकडे त्याने केलेल्या गुन्हेबाबत सखोल व बारकाईने तपास केला असता त्याचेकडुन तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 तोफखाना, जि. अहिल्यानगर 590/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4)
2 तोफखाना, जि. अहिल्यानगर 1056/2025भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4)
आरोपी  सागर रमेश नागपुरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, चोरी दुखापत, शस्त्र बाळगणे या सदराखाली खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कोतवाली 975/2023 भादविक 392, 34
2. कोतवाली 17/2024 भादविक 392, 34
3. तोफखाना 963/2023 भादविक 392
4. तोफखाना 1169/2023 भादविक 392
5. तोफखाना 1210/2023 भादविक 392, 34
6. तोफखाना 1527/2023 भादविक 392
7. तोफखाना 1639/2023 भादविक 392
8. तोफखाना 61/2024 भादविक 392, 34
9. श्रीरामपूर शहर 1109/2023 भादविक 392, 34
10. श्रीरामपूर शहर 1205/2023 भादविक 392
11. श्रीरामपूर शहर 1204/2023 भादविक 379,34
12. श्रीरामपूर शहर 50/2024 भादविक 392, 34
13 लोणी 12/2024 भादविक 392, 34
14 तोफखाना 140/15 आर्म ऍ़क्ट 3/25, 4/25, 7
15 भिंगार कॅम्प 149/22 भादविक 326, 143, 324, 323, 504, 506
16 तोफखाना 567/2025 बी.एन.एस. कलम 115(2),126(2), 351(2), 352,74,78
ताब्यातील आरोपी वरील गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे