सामाजिक

अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करा, सरकारच्या विरोधात प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप भर पावसात मोर्चाच्या मैदानात पावसाला न जुमानता लाखो भीमसैनिक मुबंईत अहिल्यानगर शहरातून नगरसेवक सुरेश बनसोडे व भीमसैनिक उपवर्गीकरणाच्या विरोधात!

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुबंई : दि. 1 जुलै : राज्यात अनुसूचित जाती मध्ये अ, ब, क, ड प्रमाणे जातीच्या उपवर्गीकरणाचे षडयंत्र जाती जातीत भांडणे लावण्याचे उद्योग सध्या सरकार करत आहे.
या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी नेत्यांनी आपल्या पक्षाचे राजकीय जोडे बाजूला ठेवत सर्वांनी सरकारच्या विरोधात मुबंई येथील विधान भवन येथे लाखो भीमसैनिकांच्या समवेत मुसळधार पावसाला न जुमानता मोर्चा काढला,

मुबंईतील मेट्रो सिनेमा या ठिकाणाहून हा मोर्चा निघाला होता. या भव्य मोर्चात रिपब्लिकन सेनचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे सर, जयदीप कवाडे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार राजकुमार बडोले, गणेशभाई उनवणे, अहिल्यानगरचे नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, चर्मकार महासंघांचे संजय खामकर, सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आढाव, विशाल कांबळे, समीर भिंगारदिवे, तसेच राज्यातून आलेले लाखो भीमसैनिक व आंबेडकरवादी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे