गुन्हेगारी

अवैधरित्या गांजा विक्री करणारा अटकेत; एक आरोपी फरार. बेलवंडी पोलीस स्टेशनची कारवाई

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर,दि. 30 जून : दिनांक 28 जून रोजी एपीआय नंदकुमार सोनवलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमीन शफी शेख राहणार विसापूर हा अमली पदार्थ गांजा कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने त्याचे भाई भाई चिकन सेंटर येथे विक्री करत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता, भाई-भाई चिकन सेंटर मध्ये गुंजीलाल कान्हा मेहता व 24 वर्ष राहणार शेंदवा तहसील शेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हा गांजा विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी कारवाई करत 780 ग्रॅम गांजा जप्त केला. सदर प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून मुख्य आरोपी अमीन शफी शेख हा पोलिसांना चकवा देत फरार झाला आहे.
जप्त केलेल्या गांजाबाबत अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली API नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर , धर्मराज दहिफळे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस शिपाई दादा क्षीरसागर, विनोद पवार, विठ्ठल खरमाळे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे