धार्मिक
देहू रोड ते दीक्षाभूमी धम्मरथ २०२५ चे स्वागताध्यक्षपदी आयु. सुरेश बनसोडे यांची निवड


यावेळी त्यांचा सत्कार प्रा. दि. वा. बागुल सर यांच्या हस्ते करण्यात आला. २७ सप्टेंबर रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे. धम्मरथाच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या शिकवणी, विचारधारा व सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. विविध शहरांमधून धम्मप्रेमी, अनुयायी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. दि. वा. बागुल सर म्हणाले की, “धम्मरथ हा फक्त प्रवास नसून तो समतेचा, बंधुत्वाचा आणि प्रबोधनाचा प्रवास आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन धम्माचा संदेश जन-जनापर्यंत पोहोचवावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी प्रा. विलास साठे, सुमेध गायकवाड, डॉ. सीता भिंगारदिवे, प्रा. अर्जुन कांबळे, भाऊसाहेब देठे, संतोष गायकवाड, तूरुकमारे सर, रवींद्र कांबळे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. एडके सर, घोडके सर, सिद्धार्थ आढाव, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.