देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहमदनगर लॉयर्स को. ऑप. सोसायटीच्या सभासदांकरता सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सन 2026 च्या नूतन ॲडव्होकेट डायरीचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे मॅडम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या..
आज डिजिटल युगामध्ये देखील अनेक वकील बंधू भगिनी ॲडव्होकेट डायरीचा वापर करतात त्यामुळे वकिलांसाठी डायरी ही त्यांची ओळख आहे असे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी म्हटले आहे. यावेळी सेंट्रल बारचे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था 1983 सालापासून अस्तित्वात असून आजतागायत सुरळीतपणे व्यवस्थित कामकाज करत आहे. वकिलांच्या हिताचे निर्णय आणि वकिलांना सुकर व्हावे असे कामकाज करत आहे संस्था चालवताना अडचणी आणि चढउतार येतात परंतु अडचणींमधूनच मार्ग निघत असतात त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांनी तळमळीने काम करून अधिकाधिक चांगले काम करावे विद्यमान संचालक मंडळ करत असलेल्या कामकाजाबाबत ॲड. कोठारी यांनी शुभेच्छा आणि धन्यवाद दिले.
याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील
ॲड. सतीश पाटील, लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे, व्हा. चेअरमन ॲड. संदीप पाखरे, सेक्रेटरी ॲड. विनायक सांगळे, संचालिका ॲड. अनिता दिघे, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे माजी चेअरमन ॲड. भूषण बऱ्हाटे, माजी व्हा. चेअरमन हाफिज जहागिरदार, संचालिका ॲड. वृषाली तांदळे, संचालक ॲड. रवींद्र शितोळे, ॲड. कुलकर्णी अहमदनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव ज्येष्ठ सदस्य ॲड. अच्युत पिंगळे, ॲड. मुकुंद पाटील, ॲड. मुंदडा, ॲड.
ॲड. रमेश कराळे, ॲड. सतीशचंद्र सुद्रिक, ॲड. सुरेश लगड, ॲड. मुकुंद पाटील, ॲड. अनिल सरोदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. जरंडीकर मॅडम, ॲड. मुंदडा ॲड. प्रभाकर शहाणे, ॲड. रफिक बेग
यांच्यासह कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील वकील उत्साहाने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यमान चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे यांनी प्रास्ताविक केले, ॲड. अनिता दिघे आणि ॲड. विनायक सांगळे ययांनी सूत्रसंचालन केले, ॲड. विद्यमान व्हा. चेअरमन संदीप पाखरे यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला, ॲड. हाफीज जहागिरदार यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांच्या हस्ते अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या जीव सभासदांना डायरीचे वितरण देखील करण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा