देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: (प्रतिनिधी)– सालाबादप्रमाणे बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचारासाठी राष्ट्रीय प्रवचनकार व बौद्ध धर्मप्रचारक प्रा. दि. वा. बागुल सर प्रणित देहू रोड ते दीक्षाभूमी (नागपूर) धम्मरथ २०२५ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्मरथ यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी आयु. सुरेश बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती.
शनिवारी धम्मरथ अहिल्यानगर शहरात दाखल झाला. जोरदार पावसातही या रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. दि. वा. बागुल सर यांचा स्वागत अध्यक्ष आयु. सुरेश बनसोडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
२७ सप्टेंबर रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. धम्मरथाच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या शिकवणी, विचारधारा व सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भर पावसातही धम्मप्रेमी, अनुयायी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा. दि. वा. बागुल सर म्हणाले, “धम्मरथ हा फक्त प्रवास नसून तो समतेचा, बंधुत्वाचा आणि प्रबोधनाचा प्रवास आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन धम्माचा संदेश जन-जनापर्यंत पोहोचवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांतीची शिकवण पोहोचवण्याचे हे माध्यम आहे. पावसाचे थेंब आपल्याला शिकवतात की कठीण प्रसंगातही धम्मप्रेमी मागे हटत नाहीत. समता, न्याय, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश घराघरात पोहोचवणे हेच ध्येय आहे.”
स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अहिल्यानगरमध्ये धम्मरथाचे स्वागत करताना अत्यंत अभिमान वाटतो. बागुल सरांचा हा उपक्रम म्हणजे धम्माचा प्रसार-प्रचार आणि समाजजागृतीचा अनोखा संगम आहे. आजच्या पावसातही धम्मप्रेमींचा उत्साह कमी झाला नाही, हे दाखवते की समाजात परिवर्तनाची तळमळ जिवंत आहे. हा रथ फक्त एक दिवसाचा सोहळा म्हणून न पाहता दैनंदिन जीवनात समतेची शिकवण व बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे. असल्याची भावना व्यक्त केली तर या स्वागत सोहळ्याला सुरेश भाऊ बनसोडे, अशोकराव गायकवाड, प्रा. माणिक विधाते, सुमेध गायकवाड, विलास साठे सर, अजय साळवे, किरण दाभाडे, विजय भांबळ, संजय जगताप, विशाल कांबळे, प्रा. भिमराव पगारे, विजय गव्हाळे, दत्ता खैरे, कौशल गायकवाड, सिद्धार्थ आढाव, गौतमीताई भिंगारदिवे, रवींद्र कांबळे, अंकुश मोहिते, विशाल भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, ऋषी विधाटे, सृजन भिंगारदिवे, जय दाभाडे, सुरेश भिंगारदिवे, वैभव ढाकणे, आशिष बोंदर्डे अनिकेत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा