देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर : दि. 5 सप्टेंबर : नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची आरती युवा नेते महेशभाऊ लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी साईराम सोसायटीचे चेअरमन व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, सचिव श्रीपाद वाघमारे, मच्छिन्द्र चौकटे महाराज, ज्ञानेश्वर बिमन, असीर सय्यद, खलील सय्यद, हुसेन सय्यद,महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, राजेंद्र उल्हारे, शिवसेना शिंदे गटाचे विनोद गायकवाड, दिलीप वाळके, अतुल मिसाळ, सोमनाथ बोरुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साईराम सोसायटीतील नागरिकांच्या विविध समस्या सोसायटीचे चेअरमन सुनील शिंदे यांनी युवा नेते महेशभाऊ लोंढे यांच्या समोर मांडल्या, व त्या समस्या आपण निश्चितपणे सोडवू असे आश्वासन युवा नेते लोंढे यांनी येथील नागरिकांना दिले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोशिक, उपाध्यक्ष संजय क्षीरसागर, जय कुऱ्हाडे, प्रवीण सय्यद, सुनीता शिंदे, सुनीता गोशिक, शकुंतला शिंदे, वृषाली कल्याणकर, पूजा बामन,दिकोंडा मावशी, समीना सय्यद, सायली कांबळे, काजल कुऱ्हाडे, सायरा सय्यद, रेखा येडाळे, सायरा शेख, शोभा क्षीरसागर त्याच प्रमाणे परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा