देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 10 सप्टेंबर : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, नगर तालुका पो.ठाणे हद्दीत दिनांक 22/08/2025 रोजी दाखल गु.र.नं. 684/ 2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 109 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीची माहिती काढत असतांना, पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारा मार्फत सदर गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी नामे विकी संजय काळे, वय- 30 वर्षे, रा. भोरवाडी, ता.जि. अहिल्यानगर यांने व त्यांचे साथीदारांनी केला असून, ते चास शिवारात आहे. नमुद गुप्तबातमीचे आधारे पोनि कबाडी यांनी तात्काळ सपोनि हरिष भोये, सफौ. रमेश गांगर्डे, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोकॉ/ भाऊसाहेब काळे, पोकॉ/ अमोल कोतकर, पोकॉ/ बाळासाहेब खेडकर, पोकॉ/ प्रशांत राठोड, चा.सफौ. महादेव भांड यांचे पथक नमुद ठिकाणी रवाना केले. नमुद ठिकाणी पथकाने शोध घेतला असता, 1) विकी संजय काळे, वय- 30 वर्षे, रा. भोरवाडी, ता.जि. अहिल्यानगर हा मिळुन आला, त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांने सदर सदरचा गुन्हा स्वत: व इतर साथीदार 2) सुरेश उर्फ पटया आण्णा भोसले, रा. पाटोदा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर (फरार), 3) मंगेश रामदास काळे, रा. सदर, (फरार) 4) वैभव उर्फ मुक्या किरन भोसले, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड, (फरार) 5) सुशांत सुरेश भोसले, रा. कामरगांव, ता.जि. अहिल्यानगर (फरार) अशांनी मिळुन केल्याचे सांगितले. आरोपीला ताब्यात घेवुन, आरोपीची अंगझडती घेतली असता, त्यांचेकडे रु. 31,000/- किंमतीचे सोने व चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळुन आला.
ताब्यातील आरोपीकडे विचारपुस करुन, वरील क्र. 2) ते 5) यांचा गुन्हयातील साक्षीदार शोध घेतला, मात्र ते मिळुन आले नाही यास्तव क्र. 2) ते 5) आरोपी फरार आहेत. ताब्यातील आरोपी 1) विकी संजय काळे, वय- 30 वर्षे, रा. भोरवाडी, ता.जि. अहिल्यानगर आणि रु. 31,000/- किंमतीचे सोने व चांदीचे दागिने असा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा