निधन

कृषी सेवा सोसायटीचे माजी संचालक लालाजी भिंगारदिवे यांचे निधन!

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 21 सप्टेंबर : फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील दरेवाडी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृषी सेवा सोसायटीचे माजी संचालक लालाजी नामदेव भिंगारदिवे (वय : 93) यांचे आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले, नातवंडे, पुतणे, भाऊ तसेच मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाने नगर तालुक्यात व दरेवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.ऑल इंडिया पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हा अध्यक्ष नवीन भिंगारदिवे यांचे ते आजोबा होते. त्यांचा अंत्यविधी आज दि. 21 सप्टेंबर रोजी दरेवाडी येथील अमरधाम येथे सायंकाळी 6 वाजता होणार असल्याची माहिती त्यांचे नातू नवीन भिंगारदिवे यांनी दिली आहे.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे