गुन्हेगारी

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 सप्टेंबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी सचिन बाळासाहेब वाघ, वय 30, रा.नवनागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर यांना दोन तीन दिवसापुर्वी तीन अनोळखी इसमांनी भेटून त्यांचेकडे घराच्या खोदकामात सोने सापडले असून त्यातील 1 किलो सोने स्वस्तात विकायचे आहे असे सांगून आरोपीतांनी त्यांना सोन्यासारखे दिसणारे दागीने दाखवून विश्वास संपादन केला.फिर्यादीने आरोपीतांना 1 लाख रूपये ऍ़डव्हान्स म्हणून दिले व उर्वरीत व्यवहार करण्यासाठी आरोपीतांनी फिर्यादीस दिनांक 23/09/2026 रोजी रात्री 11.00 वा.सुमारास जुने आरटीओ ऑफीस परिसरात बोलावले होते.परंतु फिर्यादीस याचा संशय आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेस वरील घटनेची माहिती सांगीतली.
श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी वरील माहितीच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संदिप पवार, शाहीद शेख, विशाल गवांदे, संतोष खैरे, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे अशांचे पथक तयार करून, माहितीची खात्री करून कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 23/09/2026 रोजी पथकाने पंचासमक्ष जुने आरटीओ ऑफीस, अहिल्यानगर परिसरात सापळा रचुन थांबले असता संशयीत दोन पुरूष व एक महिला मिळून आल्याने 1) राहुल शंभु सोलंकी, वय 24, रा.रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता.जि.नागपूर 2) नंदु मानसिंग सोलंकी, वय 36, रा.केकेनगर, पडसोडा, रामटेक, ता.जि.नागपूर व 3) पुजा राहुल सोलंकी, वय 24, रा.रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता.जि.नागपूर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांची झडती घेऊन त्याचे कब्जातून 1600 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे मण्यांची माळ, 52,000/- रू किं.त्यात 11 मोबाईल, एक हँड बॅग असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपी नामे राहुल शंभु सोलंकी यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने वरील साथीदारासह लोकांना स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून, लोकांकडून पैस घेऊन त्यांना बनावट सोन्याचे दागीने देतात तसेच बनावट दागीने विक्री करण्याकरीता जप्त केलेल्या मोबाईलचा वापर करत असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीस जप्त केलेल्या मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यांचेविरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 817/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे