गुन्हेगारी

पाथर्डी येथील कपाशीच्या शेतातील गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 11.600 किलो गांज्याच्या झाडासह सराईत, यापुर्वी हद्दपार केलेला आरोपी ताब्यात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 सप्टेंबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विकास साळवे, गणेश लोंढे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर व वंदना मोढवे अशांचे पथक तयार करून जिल्हयातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 23/09/2026 रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे किशोर बन्सी जायभाये, रा.येळी, ता.पाथर्डी याने त्यांचे जांभळी गावचे शिवारातील शेतीमध्ये कपाशीचे पिकात गांज्याच्या झाडांची लागवड केली आहे.पथकाने मिळालेली गोपनीय माहिती सपोनि/श्री रोहन खंडागळे, पाथर्डी पोलीस स्टेशन यांना लेखी अहवालाद्वारे कळविली.त्यानंतर सपोनि/खंडागळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव उपविभाग यांचे आदेशान्वये सपोनि/रोहन खंडागळे, पाथर्डी पोलीस स्टेशन हे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोउपनि/संदिप मुरकुटे व पोलीस अंमलदार नितीन दराडे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, अक्षयकुमार वडते, निलेश गुंड व दुर्योधन म्हस्के यांचेसह कारवाई करण्याकरीता पंचासह आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन इसम नामे किशोर बन्सी जायभाये याचे जांभळी गावचे शिवारातील शेतीमधील कपाशीचे पिकाची किशोर बन्सी जायभाये याचेसह पंचासमक्ष पाहणी केली असता कपाशीचे पिकामध्ये पाच लहान मोठी झाडे मिळून आल्याने 1) किशोर बन्सी जायभाये, वय 39, रा.येळी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीचे शेतामधुन 2,32,000/- रू किंमतीची 11.600 किलो वजनाची गांज्याची एकुण पाच लहान मोठी झाडे जप्त करण्यात आली.आरोपीविरुध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.1169/2026 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (ब)(क), 20(अ) (ब), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपी किशोर बन्सी जायभाये याचेवर यापुर्वी दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता तो पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 448/2026 बीएनएस कलम 132, 303(2), 62, 352, 351(2) या गुन्हयात फरार असल्याचे निष्पन्न झाले.तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यास उपविभागीय दंडाधिकारी, पाथर्डी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये दिनांक 30/01/2024 रोजीपासुन 2 वर्षाकरीता अहिल्यानगर जिल्हयामधुन व बीड जिल्हयातील शिरूर व आष्टी तालुक्यातून हद्दपार केले होते.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे