देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दिनांक 6 जुलै : प्रभाग क्रमांक 15 मधील आनंद नगर भागामध्ये रस्त्यालगतच्या विजेच्या खांबाला चिटकून दुर्दैवी अंत झाल्याची हृदय द्रावक घटना महावितरणच्या बोगस कारभारामुळे घडली आहे. प्रीती किरण गांगुर्डे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आई वडील काम करणारे अत्यंत गरीब कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शहरातील तसेच रेल्वे टेशन आनंद नगर परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच महावितरण च्या हलगर्जीपणाचा संताप देखील व्यक्त होत आहे. याबाबत महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अशाच चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा