ब्रेकिंग

अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड! आरोपीकडून 28,88,330/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 30 जून :अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणा-याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून 28, 88,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्याचे समुळ उच्चाटन करणे बाबत आदेश दिलेले आहेत.
वरील आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 29/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा येथे इसम  अमोल जाधव याने प्रतिबंधित आणि शरिरास अपायकारक होईल असा गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्री करणे करीता खरेदी केलेला असुन तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानंतर पथकाने इसम अमोल जाधव याचे राहते घराजवळ जावुन खात्री करता. तेथे तीन इसम पांढरे रंगाचे कारमधुन काही गोण्या स्विप्ट कारमध्ये भरतांना दिसले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन तीन इसम ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) अमोल रामदास जाधव, वय-35 वर्षे रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, 2) अनिल रतन कुरुमकर, वय- 43 वर्षे, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, 3) फरहान रेहमान बेपारी वय- 23 वर्षे रा. बुरुडगल्ली, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे सदरचा माल कोठुन आणला व कोणाचे सांगणेवरुन सदर मालाची विक्री करतो याबाबत विचारपुस करता अमोल जाधव याने कळविले की, सदरचा व्यवसाय हा मी व 4) दिपक लोखंडे रा. लोखंडेवाडी , ता. श्रीगोंदा (फरार) असे भागीदारी मध्ये चालवतो.व सदरचा माल जत जि.सांगली येथुन 5) अप्पु (पुर्ण नाव माहिती नाही)(फरार), 6) माजीद (पुर्ण नाव माहित नाही)(फरार) यांचेकडुन खरेदी केल्याचे सांगितले, तसेच फरहान रेहमान बेपारी यांनी सदरचा मला 7) शोयेब राजु तांबोळी रा. बुरुडगल्ली ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर(फरार) यांचे सांगणेवरुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असलेबाबत कळविले,
आरोपीचे कब्जातुन 6,03,200/- रु किमतीचा आर.एम.डी, विमल पान मसाला/गुटखा व्ही-1 सुगंधी तंबाखु, 22,00,000/-रु किमतीचे दोन चारचाकी वाहने त्यामध्ये अल्कायझर कार, स्विप्ट कार, 30,130/-रु रोख रक्कम, 55,000/-रु कि.चे तीन मोबाईल, चार असा एकुण 28,88,330/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोकॉ/2574 मनोज मोहन साखरे नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 649/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,223, 274,275,3(5), सह अन्न सरुक्षा मानके 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे