गुन्हेगारी

घातपात करण्यासाठी तलवार बाळगणारा इसम तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर, दि. 29 जून : थोडक्यात हकीगत अशी की, दि.27/06/2026 रोजी पोलीस अंमलदार गोरक धाकतोडे, बक्कल नंबर 1506 यांना तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डायल 112 कामी ड्युटी नेमण्यात आली होती. पो.कॉ गोरक धाकतोडे हे ड्युटी हजर असताना त्यांना डायल 112 यावर कॉल आला की, रेणुकानगर, बोल्हेगांव येथे एक इसम जुन्या भांडण्याच्या कारणातुन घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेवुन परिसरात फिरत आहे असा कॉल प्राप्त झाला. त्या अनुषगांने लागलीच पो.कॉ गोरक धाकतोडे यांनी सदर बाब हि गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य साहेब यांना कळविल्याने असता त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश चाहेर यांना त्यांच्या गुन्हे शोध अंमलदारासह पो.कॉ गोरक धाकतोडे यांना मदतीसाठी रेणुकानगर, बोल्हेगांव येथे पाठविलेल्या असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी त्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारासह डायल 112 ला मिळालेल्या माहितीच्या आधारे तलवार घेवुन फिरणा-या इसमाचा रेणुकानगर, बोल्हेगांव परिसरात शोध घेतला असता एक इसम कंबरेला काही तरी टोकदार वस्तु घेवुन फिरत असल्याचे निर्देशनास आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शैलेश इग्नाती पाळंदे, वय 45 वर्षे, रा.रेणुकानगर, बोल्हेगांव, ता.जि.अहिल्यानगर असे सांगितले. त्याच्या कब्जात 1000/- रु किं.ची 35 इंच लांबीची टोकदार तलवार मिळुन आली आहे. सदर बाबत तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि नं.525/2026, आर्म ॲक्ट कलम 4/25 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.फौ / थोरवे हे करत आहे.
*सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.मुम्मका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी वैद्य, तोफखाना पो.स्टे अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार तसेच डायल 122 साठी नेमलेले पोलीस कर्मचारी गोरक धाकतोडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे