ब्रेकिंग

बावीस वर्षां पूर्वीच्या जुन्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद! नाव बदलवून आरोपी देत होता पोलिसांना चकमा

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 जून : माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेल्या विशेष पाहिजे व फरार आरोपी शोध मोहमे अंतर्गत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं.158/2004 भा.द.वि.का.कलम 394,34* मधील पाहिजे आरोपी
महेश दरड्या पवार, वय 45 वर्षे, रा.निमगांव खलु, ता.श्रीगोंदा हा श्रीगोंदा हद्दीत नाव बदलवून वावरत असल्या बाबत गुप्त बातमी दारा मार्फत बातमी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करणे बाबत दिनांक २६/०६/२०२६ रोजी आदेशीत केले. सदर माहितीची शहानिशा करून खात्री केल्यानंतर पोलिस पथकास दिनांक २७/०६/२०२६ रोजी वेशांतर करून आरोपीस ताब्यात घेणे कामी श्रीगोंदा पोलीस पथक यांना आज रवाना केले असता सदर पथकाने आरोपीस शीताफिने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता आरोपी महेश शाम पवार हा त्याचे वडिल मयत झाल्याने त्याच्या आईने दरड्या पवार याचेशी दुसरा विवाह केला होता. सदरचा गुन्हा हा त्यावेळी महेश दरडया पवार नावाने दाखल असल्याने सदरचा आरोपी हा महेश श्याम पवार या नावाने आपली ओळख लपवून राहत होता. अशी कबुली दिल्याने आरोपी महेश श्याम पवार हाच महेश दरड्या पवार असल्या बाबत खात्री झाल्याने त्यास आज रोजी अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा श्री मुम्मका सुदर्शन सो, अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.वैभव कलुबुर्मे सो, पोलीस उपाधीक्षक मा.श्री.सुजीतकुमार क्षीरसागर सो यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठेंगे पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पो.उप.निरी.मनोहर खिळदकर, पोकाॅ.आनंद मैड, पोकाॅ.वैजिनाथ कुटे, पोकाॅ.राहुल मोढळे, पोकाॅ.अरुण पवार, पोकाॅ.पळसे काष्टी बीटचे पोहेकाॅ.पांडुरंग भांडवलकर पोहेकाॅ.नितीन नरुटे, मपोकाॅ.गितांजली लाड चापोकाॅ.शरद चोभे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे