सामाजिक

जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे निधनामुळे 9 ऑगस्ट रोजी होणारा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा तूर्त स्थगित! 9 ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय अभिवादन सभेचे आयोजन केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित राहणार : नगरसेवक सुरेश बनसोडे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 ऑगस्ट : आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे दि. 2 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट रोजी होणार आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात होणारा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला असल्याची माहिती महानगर पालिकेचे नगरसेवक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कालकथित अशोकराव गायकवाड यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अशोकराव गायकवाड यांचे चिरंजीव हर्षल गायकवाड,जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक अजय साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सुरेंद्र थोरात, विजयराव भांबळ, प्रा. विलास साठे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भिमराव पगारे, प्रा. एल. बी. जाधव,प्रा. निवृत्ती आरु, एम. एन. पवळे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट,महेंद्र राजगुरू,सुनिल क्षेत्रे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,आरपीआय चे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे पत्रकार महेश भोसले,सुरेश भिंगारदिवे,सिद्धार्थ आढाव, कौशल गायकवाड,शिवसेना उबाठाचे मृणाल भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे,विशाल कांबळे, रवींद्र कांबळे, किरण गायकवाड, गणेश गायकवाड, चिकू गायकवाड, विवेक विधाते,शनेश्वर पवार, दया गजभिये, पवन भिंगारदिवे,संजय साळवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना बनसोडे म्हणाले,रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता अशोकराव यांच्या घरी जलदान विधीचा कार्यक्रम होणार असून सकाळी दुपारी 12 वाजता नगर मनमाड रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे सर्व पक्षीय अभिवादन सभेचे आयोजन केले असून, या शोकसभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, तसेच राज्यातील नेते येणार असून, नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार, महानगर पालिकेचे आयुक्त,महापौर, उपमहापौर,सर्व नगरसेवक यांना शोकसभेस निमंत्रित केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले “आमच्या आठवणीतील अशोकराव ” या विशेष पुरवणीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करणार असून याबाबत लेख, कविता, दोन दिवसात जमा करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सुमेध गायकवाड यांनी केले, तर आभार महेश भोसले यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे