देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 4 ऑगस्ट :तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.०३/०८/२०२६ रोजी सकाळी ०३/०० वा.च्या सुमारास पोलीस स्टेशन स्तरावर मा.न्यायालयातून प्राप्त N.B.W वॉरंटमधील मा.न्यायालयात चकवा देणारे आरोपी अटक करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनची मोहीम राबवली. सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान २३ – NBW मधील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ०९ – B.W वॉरंटातील आरोपी यांचा जामीन कंदबा भरून त्यांना मा.न्यायालयात हजर राहण्याची समज दिली असून कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण ३२ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कोंबिंगमध्ये ऑपरेशनमध्ये सराईत आरोपी सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे हा अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत असून त्यांच्यावर अनेक न्यायालयामध्ये खटले प्रलंबित आहे. त्याच्या अटकेमुळे प्रलंबित खटले निकाली निघण्यास मदत होणार आहे.
तसेच यापुढेही तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी अचानक वॉरंट बजावणी व कोंबिंग ऑपरेशन राबवून आरोपीतांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी कळविले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.मुम्मका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी वैद्य व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा