सांत्वन

ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या निधनाने अभ्यासु आणि संघर्षशील नेतृत्व हरपले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई दि. 04 – रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या निधनाने अभ्यासु आणि संघर्षशील नेतृत्व हरपले आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवंगत अशोक गायकवाड यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
दलित पँथर भारतीय दलित पँथरपासुन अहिल्यानगर जिल्हयात आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेले अशोक गायकवाड यांनी माझ्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरपासुन रिपब्लिकन पक्षापर्यंत मला साथ दिली आहे. रिपब्लिकन चळवळीचा लढाऊ नेता आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वशैलीने संपूर्ण जिल्हयात दिवंगत अशोक गायकवाड लोकप्रिय होते. अशोक गायकवाड यांची वैचारीक बैठक प्रगल्भ होती. अहिल्यानगरमधील आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज म्हणून अशोक गायकवाड यांचे नेतृत्व पुढे आले होते. माझ्या नेतृत्चावर त्यांनी विश्वास ठेवून अनेक वर्ष रिपब्लिकन पक्षाचे काम अखंड केले होते. अहिल्यानगर जिल्हयातील जनतेच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण होती. अहिल्यानगर मधील सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय होते. मतभेद असतील पण त्यांचे कोणाशीही मनभेद नव्हते. सर्वांना सोबत घेवून पुढे जाणारे अशोक गायकवाड असे कार्यकर्ते होते. त्यांचे दिनांक 2 ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
येत्या 9 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये त्यांचा जलदान विधी असुन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे.त्यांस केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले उपस्थित राहणार असून गायकवाड कुटुंबियांची सात्वंनपर भेट घेणार आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे