देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 सप्टेंबर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तसेच संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी ६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थिती विराट संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील आंबेडकरी समाजबांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाचे आयोजक अध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी केले.
अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या अनुयायांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एन. एम. पवळे होते. प्रारंभी अशोक गायकवाड, त्यांच्या पत्नी, राजाभाऊ कापसे तसेच अन्य दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी विविध विषयांवर आपापली मनोगते व्यक्त केली. बैठकीदरम्यान ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संविधान बचाव मोर्चाच्या आयोजक अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसोडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली यावेळी सुमेध गायकवाड, संजय खामकर, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, निवृत्ती आरु, विलास साठे, सुनील शिंदे, राजेंद्र साळवे, विशाल गायकवाड, नाथा आल्हाट, विजयराव भांबळ, प्रा जाधव सर, महेंद्र राजगुरु, शाहुराव साळवे, महेश भोसले, भाऊ भिंगारदिवे, विशाल कांबळे, अक्षय भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, प्रशांत गायकवाड, गौरव गव्हाळे, दीपक पाटोळे, पवन भिंगारदिवे, हर्षल गायकवाड, प्रा भीमराव पगारे, जाधव एल बी, संदीप वाकचौरे, समीर भिंगारदिवे, प्रदीप जाधव, भास्कर भैलूमे, शनेश्र्वर पवार, सोमनाथ साठे, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, निखिल साळवे, चिकू गायकवाड, गणेश गायकवाड, शांतवंन साळवे, श्रीकांत भोसले, जयश्री गायकवाड, गौतमी ताई भिंगारदिवे, सारिका गांगर्ड, माया जाधव, सागर ठोकळ, सचिन शेलार, महेश अंगारखे, दिनेश पंडित, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे आदीसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, विविध समाजघटकांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ शकते, अशी चिंता उपस्थितांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट अनुसूचित जातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मत मांडत उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द होईपर्यंत संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजबांधव, सामाजिक संघटना आणि संविधानप्रेमी नागरिकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
मोर्चाचा मार्ग:
६ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा, पांचवीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेली खुंट, नेतासुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा आणि दिल्ली गेट मार्गे नीलक्रांती चौक येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.
या बैठकीस समस्त आंबेडकरी समाजाचे अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विराट संविधान बचाव मोर्चात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा