अहिल्यानगर येथील 5 गावठी हातभट्टी दारू अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! छाप्यात 410 लिटर गावठी दारू व 6500 लिटर कच्च रसायन जागीच नष्ट

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 11 सप्टेंबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये, पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार संदिप पवार, बिरप्पा करमल, भिमराज खर्से, संतोष खैरे, शाहीद शेख, अतुल लोटके, अभिजीत अरकल,विजय ठोंबरे, विकास साळवे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, अमोल आजबे, सतीष भवर, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, सुनिता पवार, सोनल भागवत, ज्योती शिंदे, भाग्यश्री भिटे, किरण ठुबे अशांचे पथके तयार करून अहिल्यानगर तालुका हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 09/09/2026 रोजी पथकाने अहिल्यानगर तालुका स्टेशन हद्दीतील नेप्ती गावामधील गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन 05 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 11 आरोपीविरूध्द 05 गुन्हे दाखल करून एकुण 3,63,500/- रूपये किंमत त्यात 410 लिटर गावठी हातभट्टी दारू व 6500 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला आहे.
अ.क्र. पोलीस गुरनं व कलम जप्त मुद्देमाल मुद्देमालाचे वर्णन आरोपीचे नाव
1 नगर तालुका 805/2026 बीएनएस कलम 123, 275, 3(5) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) 41,000/- 700 लिटर कच्चे रसायन,
60 लिटर गावठी हातभट्टी दारू 1) अजय चांगदेव पवार, वय 27, रा.मराठी शाळेजवळ नेप्ती, अहिल्यानगर
2) शशीकला चांगदेव पवार, रा.सदर
ü (फरार)
2 नगर तालुका 806/2026 बीएनएस कलम 123, 275, 3(5) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) 1,17,000/- 2200 लिटर कच्चे रसायन
70 लिटर गावठी हातभट्टी दारू 1) सुनिल बाजीराव पवार, वय 43, रा.नेप्ती, अहिल्यानगर
2) राजू बाजीराव पवार, रा.नेप्ती, अहिल्यानगर (फरार)
3 नगर तालुका 807/2026 बीएनएस कलम 123, 275, 3(5) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) 63,000/- 1200 लिटर कच्चे रसायन
30 लिटर गावठी हातभट्टी दारू 1) दिपक बबन नागपूरे, वय 47, रा.नेप्ती, अहिल्यानगर
2) लहानुबाई छबु पवार, रा.नेप्ती, अहिल्यानगर (फरार)
4 नगर तालुका 808/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क) (ड) (ई) 1,20,000/- 2000 लिटर कच्चे रसायन
200 लिटर गावठी हातभट्टी दारू 1) भारत माणिक पवार, वय 43 रा.नेप्ती, अहिल्यानगर
2) मंगल भारत पवार, रा.नेप्ती, अहिल्यानगर (फरार)
5 नगर तालुका 809/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क) (ड) (ई) 22,500/- 400 लिटर कच्चे रसायन
50 लिटर गावठी हातभट्टी दारू 1) शरद माणिक पवार, वय 40, रा.नेप्ती, अहिल्यानगर
2) ज्योती भरत पवार, रा.नेप्ती, अहिल्यानगर (फरार)
3) कमल माणिक पवार रा.सदर (फरार)
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



