देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 11 सप्टेंबर :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 31/05/2026 रोजी यातील फिर्यादी नवनाथ विष्णु पडळकर, वय 51, रा.तांबेनगर, बारामती, ता.बारामती, जि.पुणे हे कार्यक्रमाकरीता चौंडी, ता.जामखेड येथे आले असता गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन व चैनमधील पेंडल चोरून नेले.याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 362/2026 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्हयातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अमोल आजबे याचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 09/09/2026 रोजी तपास पथक गुन्हयातील आरोपीची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम अर्जुन मुरकुटे, रा.मुर्शदपूर, ता.आष्टी, जि.बीड याने त्याचे साथीदारासह केला आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून आरोपीचे वास्तव्याचे ठिकाणी शोध घेऊन 1) राम अर्जुन मुरकुटे, वय 31, रा.मुर्शदपूर, ता.आष्टी, जि.बीड यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 2) सोमीनाथ कैलास कुसळकर, रा.मुर्शदपूर, ता.आष्टी, जि.बीड (फरार) व 3) लखन अर्जुन मुरकुटे, रा.मुर्शदपूर, ता.आष्टी, जि.बीड (फरार) यांचेसह केला असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपींकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेला मुद्देमाल आरोपीतांनी आपसात वाटुन घेतला.आरोपी राम अर्जुन मुरकुटे व लखन अर्जुन मुरकुटे याचे वाटयाला आलेला मुद्देमाल त्यांनी बीड येथील सोनारास विकल्याची माहिती सांगतल्याने पथकाने सोनारास चौकशीकामी हजर राहणेबाबत नोटीसची बजावणी करुन, त्याने पंचासमक्ष हजर केलेली 2,40,000/- रू किं. 16 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
आरोपीचे नाव अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
राम अर्जुन मुरकुटे 1 शिक्रापुर 86/2017 भादंविक 393, 34
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा