गुन्हेगारी
जिल्हयातील गावठी हातभट्टी, देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे सोनई, नेवासा, कोपरगाव येथील कारवाई 6 गुन्हे दाखल

-
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 13 सप्टेंबर :मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, बाळासाहेब नागरगोजे, विकास साळवे, अशोक लिपणे, वंदना मोढवे, सतीष भवर, गणेश लोंढे, संतोष खैरे, रणजीत जाधव, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ अशांचे दोन पथक तयार करून जिल्हयातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

दिनांक 12/09/2026 व दिनांक 13/09/2026 रोजी पथकाने सोनई, नेवासा, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी, देशी विदेशी दारू विक्रेत्यांची माहिती काढुन 06 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 7 आरोपीविरूध्द 6 गुन्हे दाखल करून एकुण 28,245/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.




