देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 13 सप्टेंबर :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दि. 11/09/2026 रोजी यातील मयत तान्हाजी भास्कर बोराडे, रा.माळेवाडी, ता.भूम, जि.धाराशीव यास खर्डा ता.जामखेड येथे मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी डोळयात मिरची पावडर टाकून, मयताचे डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारले.याबाबत खर्डा पोलीस स्टेशन गुरनं 158/2026 बीएनएस कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
खर्डा पोलीस स्टेशनला दाखल ना उघड खुनाचे गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव व पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, अरूण मोरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड अशाचे पथक तयार करून गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना दिनांक 13/09/2026 रोजी नमूद हा प्रसाद अशोक अडागळे याने त्याचे 3 अल्पवयीन साथीदारासह केला आहे.तसेच गुन्हयातील मुख्य आरोपी हा पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पुणे शहरात तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीचा शोध घेऊन 1) विधीसंघर्षीत बालक, वय 17, रा.भुम, ता.भुम, जि.धाराशीव यास ताब्यात घेतले.गुन्हयाचे तपासात इतर आरोपी हे टाकळीमिया राहुरी येथे असल्याच्या माहितीवरून पथकाने त्याचा शोध घेऊन 2) प्रसाद अशोक अडागळे, वय 18, रा.टाकळीमियॉ, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर 3) विधीसंघर्षीत बालक, वय 16, रा.कारखाना रोड, टाकळीमियॉ, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर 4) विधीसंघर्षीत बालक, वय 17, रा.टाकळीमियॉ, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
वर नमूद ताब्यात घेण्यात आलेल्या एक आरोपीस तीन विधीसंघर्षीत बालकास गुन्हयाचे तपासकामी खर्डा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा तपास खर्डा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे,अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा