देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 सप्टेंबर :मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व श्री.हमीद चाँद शेख, पोलीस निरीक्षक, अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, अहिल्यानगर याचे आदेशान्वये पोउपनि/विकास जाधव, अनंत सालगुडे, संदिप दरवडे व पोलीस अंमलदार शकील शेख, समीर सय्यद, अर्चना काळे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, विष्णु भागवत, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, किरण ठुबे, सुनिल पवार, शामसुंदर जाधव, अभिजीत अरकल, दिपक जाधव, सुनिता पवार, बाळासाहेब खेडकर, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, पंकज व्यवहारे, योगेश कर्डीले व चिमा काळे अशांचे तीन पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
दिनांक 14/09/2026 रोजी पथके शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, महिला नामे 1) निर्मला भाऊसाहेब कदम, रा.शिवनगर, शेवगाव 2) शबाना शरीफोद्दान सय्यद, रा.नेहरूनगर, शेवगाव व 3) अभिनव नंदु आंधारे, रा.शिवनगर शेवगाव असे शिवनगर, शेवगाव परिसरामध्ये तीन वेगवेगळया ठिकाणी महिलांकडून वेश्याव्यवसाय चालवित आहेत.
मिळालेल्या माहितीवरून तीन पथकाने पंचासमक्ष तीनही ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता बनावट ग्राहक पाठवून तेथे वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष छापा टाकुन कारवाई केली.पथकाने छापा टाकलेल्या तीन वेगवेगळया ठिकाणावरून 3 आरोपींनी ताब्यात घेऊन ते स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द शेवगाव पोलीस स्टेशनला स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7 व 8 अन्वये तीन गुन्हे दाखल केले आहेत.तसेच 8 पिडीत महिलांची सुटका केली आहे.
पोलीस स्टेशन गुरनं आरोपी नाव व पत्ता पिडीत महिलांची संख्या
शेवगाव 730/2026 निर्मला भाऊसाहेब कदम, वय 50, रा.शिवनगर, शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर 3
शेवगाव 731/2026 शबाना शरीफोद्दीन सय्यद, रा.नेहरूनगर, शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर 3
शेवगाव 732/2026 अभिनव नंदु अंधारे, वय 36, रा.शिवनगर, शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर 2
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा