सामाजिक

देशस्तंभ न्यूजच्या जिल्हा प्रतिनिधी पदी सामाजिक कार्यकर्ते सतीश थोरात यांची निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 4 सप्टेंबर : सामाजिक कार्यकर्ते सतीश थोरात यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्कच्या अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी त्यांना देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे ओळख पत्र देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक महेश भोसले, उपसंपादक सुरेश भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी थोरात यांचे अभिनंदन करत, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.थोरात यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व मित्रपरिवारा कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

निवडीबद्दल सतीश थोरात यांची प्रतिक्रिया :
माझ्यावर देशस्तंभ न्यूज परिवाराने जी जबाबदारी टाकली आहे, निश्चितच योग्य पद्धतीने पार पाडीन, व अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी या पदाच्या माध्यमातून मी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे