गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्हयातील अवैध मावा-गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पाथर्डी, एम.आय.डी.सी व कोतवाली येथे 4 छाप्यात 5,30,146 रूपयाचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्युज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 3 सप्टेंबर : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, अतुल लोटके, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, गणेश लोंढे, निळकंठ रंगनाथ कारखेले, रणजित जाधव, सतिष भवर, बाळासाहेब गुंजाळ अशांचे तीन पथक तयार करून जिल्हयातील अवैध गुटखा, मावा व सुगंधीत तंबाखु व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 02/09/2026 व दिनांक 03/09/2026 रोजी पथकाने पाथर्डी, एम.आय.डी.सी. व कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधीत तंबाखु, मावा, गुटखा तयार करून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन 04 विविध ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 11 आरोपीविरूध्द 4 गुन्हे दाखल करून एकुण 5,30,146/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं व कलम जप्त मुद्देमाल किंमत आरोपीचे नाव
1 पाथर्डी 1046 /2026 बीएनएस 123, 223, 274, 275 81,400/- 1) आकाश अशोक चातुर वय-30 वर्षे रा. कजबा पाथर्डी, जि.अहिल्यानगर
2 पाथर्डी 1047/2026 बीएनएस 123, 223, 274, 275,3(5) 1,18,470/- 1) नेहाल शफिक आतार वय-32 वर्षे रा. भवानी चौक, पाथर्डी, ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर
2)फरदीन रफीक शेख उर्फ जहागीरदार रा.वार्ड नं.02 श्रीरामपुर जि. अहिल्यानगर(फरार)
3) रिजवान अमीन शेख रा.मरक मस्जिद वार्ड नं.02 श्रीरामपुर जि. अहिल्यानगर (फरार)
3 एम.आय.डी.सी. 702/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 2,32,000/- 1) अमोल सुनिल शिंदे वय- 39 वर्षे रा.वडगाव गुप्ता ता.जि.अहिल्यानगर
2)शफीक यासीन शेख वय-34 वर्षे रा. वडगाव गुप्ता ता.जि.अहिल्यानगर
3) गणेश कोलते रा.बोल्हेगाव ता.जि.अहिल्यानगर (फरार)
4) किशोर कोलते रा.बोल्हेगाव ता.जि.अहिल्यानगर(फरार)
 4) कोतवाली 841/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 98,276/- 1) अर्शद बाबा बागवान वय-32 वर्षे रा. वारुळाचा मारुती, नालेगाव ता.जि.अहिल्यानगर
2) जाहिब मुश्ताक खान, रा.मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर(फरार)
3) शोयेब मुश्ताक खान रा.मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर (फरार)
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे