देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 4 सप्टेंबर : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.त्यानुषंगाने प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार व श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार विष्णु भागवत, योगेश भिंगारदिवे, विकास साळवे, सागर ससाणे व महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे अशांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
दिनांक 03/09/2026 रोजी पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, महिला नामे झिनत फैय्याजअली महंमद, रा.संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर ही तिचे राहते घरामध्ये महिलांकडून कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार यांना बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.
पथकाने त्याठिकाणी वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष छापा टाकुन महिला झिनत फैय्याजअली महंमद, वय 44, रा.संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा,रेल्वेस्टेशन, अहिल्यानगर हिस ताब्यात घेतले. ताब्यातील महिलेसह तिचे राहते घरची झडती घेतली असता तिचे घरामध्ये 2 महिला मिळून आल्या.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी झिनत फैय्याजअली महंमद हिने त्यांना वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ती ग्राहकाकडून पैसे घेऊन, त्यामधुन आम्हास पैसे देऊन आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पिडीत 2 महिलांची सुटका केली आहे.
तपास पथकाने आरोपी महिला
झिनत फैय्याजअली महंमद, वय 44, रा.संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वेस्टेशन, अहिल्यानगर ही स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 2 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने तिचेविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 845/2026 स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा