देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 सप्टेंबर : माळीवाडा एसटी स्टॅन्ड ते माळीवाडा परिसर हे अहिल्यानगरचे मध्यवर्ती ठिकाण अर्थात नाक म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, दबंग पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी काही महिन्यापूर्वी अहिल्या नगरचा पदभार स्वीकारल्याने जिल्ह्यात व शहरात त्यांच्या वेश्या व्यवसाय व इतरही बेकायदेशीर धंद्यावर केलेल्या कारवाईमुळे तसेच याच आठवड्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसायावर खाकीचा बडगा उगारत केलेल्या कारवाईमुळे सर्व सामान्य नागरिक व महिलांना ते आपल्या समस्या सोडविणारे घरातील अधीक्षक वाटतात, परंतु हे जरी खरे असले तरी माळीवाडा बस स्टॅन्ड ते माळीवाडा परिसर या ठिकाणी आजही दिवसा ढवळ्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालया समोरच, माळीवाडा येथे नागरी वस्ती आहे. त्या वस्त्यांच्या बाजूला रस्त्यावरच काही लॉजवर वेश्या व्यवसाय बिनधास्त सुरु आहेत.
त्यामुळे परिसरातील व्यवसायिक तसेच येथे राहणाऱ्या महिला व नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. एकंदरीतच “सुदर्शन साहेबांचे सर्व सामान्य नागरिकांसाठी उल्लेखनीयच आहे, पण साहेब आमच्या माळीवाड्यातील वेश्या व्यवसाय नेमका कधी बंद होईल? अशा प्रश्नार्थक चर्चा या भागातील नागरिक व महिलांकडून दबक्या आवाजात होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. या परिसरात देह विक्रय करण्याऱ्या महिलां बऱ्याच वेळेस रस्त्यावरच उभ्या असतात त्यामुळे नागरिकांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला साहजिकच त्रास होतो.
या परिसरात ग्रामदैवत विशाल गणपती व ग्रामदेवी महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना देखील या प्रकाराचा त्रास होतोय हे नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होतंय हे वास्तव!
माळीवाडा वेशीला तर ऐतिहासिक महत्व आहे. एकंदरीतच ऐतिहासिक महत्व, धार्मिकता, व नागरिकांच्या त्रासाचा विचार करून, नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यातून एसपी साहेब तुमच्या कार्य पद्धतीवर सर्व सामान्य खुशच आहेत, परंतु माळीवाडा व परिसरात लॉजिंग वर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर तुमच्या खाकीचे सुदर्शन चक्र फिरले तर चांगलेच होईल. अशा आशा नागरिकांना आपल्या घरातील पोलीस अधीक्षक म्हूणन अपेक्षा आहेतच!
एकंदरीतच याबाबतीत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे कधी सुदर्शन चक्र फिरवतील हे नागरिकांसाठी महत्वाचे ठरणार हे नक्की…
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा