अहमदनगर दि. 7 जुलै (महेश भोसले ) आपण रस्त्याने जातं येत असतांना प्रवास करत असतांना ट्रक, उसाच्या ट्रॉल्या, टेम्पो व इतर चारचाकी वाहने नेहमीच आपल्या दृष्टीस पडतात. त्यातल्या त्यात विविध रंगानी सजविलेल्या व नक्षीकाम व सजावट केलेल्या ट्रक आपणास पाहायला मिळतात. या ट्रकवर लिहिलेली शायरी, वाक्य हे लक्षात राहण्यासारखीच असतात. त्यातीलच काही मराठी हिंदी वाक्य पाहूया!
“दिवसा वाघीन, रात्री मात्र नागीन “, “जोरात निघाली पहाडी मैना “, “लाजली बघ!”, “ओ मालकीणबाई “, “लाडाची मैना “, ” पहा पण प्रेमाने”, ” काय बघतोस रागणं ओव्हरटेक केलंय वाघानं “, ” ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी “, “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे “, “एक गाडी बाकी सब अनाडी “, ” मालिक दिलदार लेकिन चमचे हजार “, ” जलनेवालों को मेरी दुवा “, ” घर कब आवोगे “, ” हमारी चलती है, लोगोंकी जलती है “, “वाहन चलाते समय सौंदर्यदर्शन न करे, वर्ना देवदर्शन हो सकते है “,
“रोडपर चलती होगी कार तो लगती होगी हसीना…..
पर ट्रक को मेरे देखकर आता होगा उसे पसीना”…..
अशी काही वाक्य व शेरोशायरी लिहिलेली असते. ती वाजून प्रवास करणाऱ्याचे मन आंनदी होऊन, प्रवासात येणार कंटाळावांना पणा देखील बऱ्याचपैकी कमी होतो. व आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा