कौतुकास्पद

श्रीनिवास बोज्जा यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर – स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने सन 2025 समाज रत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा यांच्यावतीने सामाजिक शैक्षणिक राजकीय अध्यात्मिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार देण्यात येत असतो याही वर्षी हा पुरस्कार अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते फटाका व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा यांना प्रदान करण्यात आले यावेळी स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नाना किसन डोंगरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे