महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त नगर शहर व भिंगार येथे अवकाळी पाऊस घाबरला तो पडलाच नाही! निसर्ग महामानवाच्या मिरवणुकीला नतमस्तक झाला! बाबासाहेब जिंदाबाद!

अहमदनगर दि. १५ एप्रिल (,प्रतिनिधी) भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थातच १४ एप्रिल भारतातच नव्हे जगात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. याच पार्श्वभमीवर नगर व भिंगार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबाना अभिवादन करून आंबेडकरी जनता साजरी करते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर हवामान खात्याने जोरदार पाउस पडण्याचा अंदाज सांगितला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पाऊसाचे वातावरण झाले होते. परंतु मिरवणुका सुरू झाल्या अन् येणारा अवकाळी पाउस आलाच नाही.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त नगर शहर व भिंगार येथे अवकाळी पाऊस घाबरला तो पडलाच नाही.
निसर्ग महामानवाच्या मिरवणुकीला नतमस्तक झाला. अशा चर्चा आंबेडकरी जनतेमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये होणे हे स्वाभाविकच आहे.शेवटी माणूस निसर्गाच्या पुढे नाही.हेही महत्वाचे आहेच.