जिल्हा परिषदेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अहमदनगर दि.१६(प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्रांगणात आज सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ रवींद्र ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे आदी अधिकारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या नंतर, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने सकाळी शहरात समता रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, समता रॅलीला मान्यवरांचे हस्ते झेंडी दाखवून सुरुवात झाली. पुढे सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालया मध्ये विशेष अभिवादन कार्यक्रमा नंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. सामाजिक न्यायाचे माहिती देणारे फलक उंचवत सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत विशेष लक्ष वेधले.