देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर :प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि.23/02/2025 रोजी फिर्यादी जयंत महादु केदार, वय 65, रा.निमगाव वाघा, ता.अहिल्यानगर हे कुटूंबियासह घरात झोपले असताना अज्ञात चोरटयांनी घरातुन सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली.याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.111/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक नेमुण मालाविरूध्दचे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 03/06/2025 रोजी पथक वर नमूद गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा चंदया पिंपळा भोसले, रा.घोसपुरी,ता.जि.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केल्याची असुन ते सर्व अरणगाव गावचे शिवारात रेल्वे पटरीजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन संशयितांचा शोध घेऊन 1) चंदया पिंपळया भोसले, वय 47 2) राकेश चंदया भोसले, वय 21 रा.घोसपुरी, ता.जि.अहिल्यानगर 3) अर्जुन संभाजी काळे, वय 20 4) गोपीचंद चंदु काळे, वय 19, अ.क्र.3 व 4 रा.कंदर ता.करमाळा, जि.सोलापूर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीताकडे पंचासमक्ष गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 5) शकल्या सुरेश भोसले, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी (फरार) 6) सफ्या रूस्तम चव्हाण, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी (फरार) 7) रोहित चाचा भोसले, रा.सय्यदमीर लोणी, ता.आष्टी, जि.बीड (फरार) यांचेसह केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपी चंदया पिंपळा भोसले यास विश्वासात घेऊन, आणखी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारासह अहिल्यानगर, पारनेर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात चोरीचे गुन्हे केलेबाबत सांगीतलेल्या माहितीवरून, जिल्हयातील पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे जबरी चोरी 01, घरफोडी 03 व चोरी 01 असे एकुण 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 नगर तालुका 111/2025 बीएनएस 303 (2)
2 सुपा 180/2025 बीएनएस 305 (अ)
3 सुपा 205/2025 बीएनएस 309 (6)
4 मिरजगाव 40/2025 बीएनएस 331 (4), 305
5 श्रीगोंदा 353/2025 बीएनएस 331 (4), 305
पथकाने पंचासमक्ष चंदया पिंपळा भोसले, वय 47, रा.घोसपुरी, ता..अहिल्यानगर याचे ताब्यातुन 2,84,750/- रू किंमतीचे त्यात 33.7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासकामी जप्त केले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा