देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शिरसाठ यांची मुलगी, तसेच महानगर पालिकेचे माजी वसुली अधिकारी राजेंद्र शिरसाठ यांची पुतणी श्रावनी जितेंद्र शिरसाठ हिची नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत महसूल सहायक( मुंबई ) म्हणून निवड झाली आहे. तीचे प्राथमिक शिक्षण समर्थ विद्या मंदिर येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण न्यू आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज मध्ये झाले.तिच्या यशा बद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक प्रा. विठ्ठल वाघमोडे, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते, प्रा. संदीप पाखरे, ऍड. अनिल धाडगे, सिद्धार्थ टपले, रोहन शिरसाठ आदी उपस्थित होते.श्रावनी हिच्या यशाबद्दल तीचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा