कौतुकास्पद

‘सलाम “त्यांच्या ” कार्याला’! रिपब्लिकन सेनेने केला “त्या ” कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा सन्मान!

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : आपला जीव धोक्यात घालून कर्तव्याशी प्रामाणिक इतरांचा जीव वाचविणे हे आजच्या काळात दुर्मिळच आहे. पण याला अफ़वाद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांचे विशेष कार्य!
गत आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रात बऱ्याच जिल्यात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
नगरतालुक्यातीलअकोळनेर,सारोळाकासार, वाळकी, खडकी खंडाळा, अतिवृष्टीमुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, यावेळी वाळकी गावातील नागरिक वाहत जात असतांना, पोलिसी खाक्यात पण माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव नगर तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला आपल्या जीवाची पर्वा न करता नगर तालुक्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीसनिरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पुरग्रसतांचे प्राण वाचविले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, प्रसिद्धीप्रमुख तथा देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, जिल्हा संघटक प्रा. विठ्ठल वाघमोडे, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते, प्रा. श्रीकांत पाखरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे