अहिल्यानगर – जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. हे आदेश ३ जुन २०२५ पर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा