देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, शिवाजी ढाकणे, भगवान थोरात अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
दिनांक 16/05/2025 रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे भा.कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर हा त्याचे राहते घराजवळ काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी आणले असून त्यांची कत्तल करत आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद ठिकाणी तीन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना दिसून आले.तसेच आजूबाजूला काही जिवंत गोवंशीय जनावरे डांबून ठेवलेले दिसून आले.पथकाने छापा टाकुन कारवाई करताना एक इसम पळून गेला.घटनाठिकाणावरून 1) सलीम मुसा शेख, वय 30, रा.कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर 2) जहीद समद कुरेशी, वय 20, रा.व्यापारी मोहल्ला, अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
ताब्यातील आरोपीस पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याचे नाव 3) असिफ खालीद कुरेशी, रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.आरोपीकडे गोवंशीय जनावराबाबत विचारपूस केली असता सदरची जनावरे ही 4) भा.कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर (फरार) याचे मालकीचे असून त्याने ती जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणली असून त्याचे सांगणेवरून आरोपी हे गोवंशीय जनावराची कत्तल करत असल्याची माहिती सांगीतली. पथकाने घटनाठिकाणावरून 2,60,200/- रू किं.त्यात 400 किलो गोमांस, एक लोखंडी सुरा, 2 गोवंशीय जिवंत जनावरे व 4 गोवंशीय वासरे असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 472/2025 बीएनएस 2023 चे कलम 271, 325, 3 (5) वगैरे प्रमाणे ü गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा