देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर – कोलकत्ता येथील प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील सहजयोगी पिंटू मुखर्जी विश्वजित घडई, दिवाकर मांडल, छबी केवडा, पौर्णिमा घडई, सुजाता सात्रा, काजोल केवडा,मिठू घोष, हिमांसू सात्रा यांनी अहिल्यानगर मधील सहज भुवन आश्रम ला भेट दिली या वेळी अहिल्या नगर मधील सहजयोगी श्रीनिवास बोज्जा, मेजर कुंडलिक ढाकणे, रवींद्र आगरकर, सौ. वासंती वैद्य, सौ. वीणा बोज्जा, कार्तिक ढाकणे, धनंजय ढाकणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कोलकत्ता येथील सहजयोगी श्री विश्वजीत घडई म्हणाले कोलकत्ता पेक्षा महाराष्ट्र राज्य ही चैतन्य भूमी आहे या ठिकाणी अनेक राजे महाराजे तसेच संत महामुनीनी देशासाठी, समाजासाठी मोठे कार्य केले असून त्यांचे कार्य आज संपूर्ण देशात पठण केले जाते. प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांनी सहजयोगा चे कार्य संपूर्ण भारतात व जगातील 150 पेक्षा जास्त देशामध्ये केलेले आहे. या योगामुळे मानवातील सुप्त शक्ती जागृत होऊन आत्मशांती मिळते या साठी सहजयोग ध्यान प्रत्येक मानवाने अंगीकृत करावे असे आवाहन केले.
अहिल्यानगर सहजयोग परिवाराच्या वतीने कोलकत्ता येथील आलेल्या सर्व सहजयोग्यांचे मान सन्मान केला. सर्व सहजयोगी हे कोलकत्ता येथील घाटाल, धनिया खाली, मोनिऱ्या आरंभबाग या गावातुन आलेले असून कोलकत्ता येथे
गोघाट आश्रम,मेदनापूर गांधी घाट आश्रम,अलाहाटी आश्रम
शिवाय चंडी आश्रम,होरी नभी आश्रम असे अनेक आश्रम असून या ठिकाणी मोठया प्रमाणात सहजयोगी आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा