ब्रेकिंग

तोतया पोलीस बनून खंडणी मागणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातून पोलिसांनी केले अटक अहिल्यानगर सायबर पोलिसांची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क ​अहिल्यानगर:दि. 14 फेब्रुवारी:
पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या एका सराईत आणि उच्चशिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपीचा नक्षलग्रस्त भागात सिनेमॅटिक पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
​घटनेचा थोडक्यात तपशील:
​अहिल्यानगर येथील फिर्यादी यांना आरोपीने स्वतःची ओळख ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील’ अशी करून दिली. “तुमच्याविरुद्ध तक्रार आली असून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल, तर ५ लाख रुपये द्या,” अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली. आरोपीने अत्यंत तांत्रिक पद्धतीने फिर्यादीला घाबरवून सोडून अटकेची भीती घातली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०३/२०२६, बी.एन.एस. ३०८(३), २०४, ३५१(२) व माहिती तंत्रज्ञान कायदा ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​नक्षलग्रस्त भागात थरारक पाठलाग:
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथक गडचिरोलीला रवाना झाले. आष्टी (ता. चामोर्शी) परिसरात पोलीस पथकाला पाहताच आरोपी चंदन दिगूराम सांगळे (वय ३०, रा. आष्टी) याने आपल्या स्विफ्ट कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले.
​आरोपीची पार्श्वभूमी:
​अटक करण्यात आलेला आरोपी चंदन सांगळे हा BE (Engineering) शिक्षित असून, तो तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध होस्टेल चालक, लॉज मालक यांचे संपर्क क्रमांक व माहिती प्राप्त करून, त्यांना टारगेट करून फसवणूक करत असे. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
​मार्गदर्शक व तपास पथक:
​सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली:
​पोलीस निरीक्षक: सागर ढिकले
​पोलीस उपनिरीक्षक: काकडे
​पोलीस अंमलदार: HC बनकर, HC कारखेले, PN अरकल, PC हिंगे, चालक ASI शेख आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.
​आवाहन: नागरिकांनी अशा प्रकारे कोणाही अनोळखी व्यक्तीच्या पोलीस अधिकारी असल्याचे सांगून केलेल्या फोनला बळी पडू नये. संशय आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे