सामाजिक

आयुक्त साहेब “त्या” महिला कामगाराला “त्या ” हॉटेल मालकाकडून कष्टकरी गरीब महिलेच्या कष्टाचे पैसे मिळवून द्या : सुनीता शिंदे महिला कामगारावर उपासमारीची वेळ! रिपब्लिकन सेनेचे कामगार आयुक्तांना साकडे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 20 जानेवारी : आयुक्त साहेब “त्या” महिला कामगारला न्याय मिळेल द्या, कष्टकरी गरीब महिलेचे कष्टाचे पैसे मिळवून द्या अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या शहर अध्यक्षा सुनीता शिंदे यांनी कामगार आयुक्त भिसले यांना केली आहे. याबाबत रिपब्लिकन सेनेचे कामगार आयुक्तांना साकडे घातले आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे, शहर अध्यक्ष सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे, पीडित महिला कामगार रुपाली आयंची, वैशाली निमसे आदी उपस्थित होते.
रुपाली देविदास आयंची असे या कामगार महिलेचे नाव आहे.
याबाबतची विस्तृत माहिती अशी की, ही कामगार महिला श्रमिक नगर सावेडी येथे राहत असून याबाबत रिपब्लिकन सेनेने कामगार आयुक्त यांना निवेदन सादर केले. सदर महिला 2022 पासून हॉटेल डीसी कॅफे येथे किचन हेल्पर, व साफसफाई कामासाठी होत्या,2022 पर्यंत सदर महिला कामगारला 14 हजार रुपये महिना पगार ठरल्याप्रमाणे हॉटेल मालक विनोद दुल्लम पगार देत होते.त्यांनतर 2023 या पूर्ण वर्षाचा पगार दिला नाही, याबाबत सदर महिला ही वारंवार हॉटेल मालकाकडे वर्षाच्या पगार द्यावा अशी विनवणी करत होती, परंतु प्रत्येक वेळेस देतो, देतो तो म्हणत उडवा उडवीच्या उतरा पलीकडे काहीच मिळाले नाही, या महिलेची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिच्यावर आज उपास वेळ आली आहे. असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत मला न्याय न मिळाल्यास रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत कामगार आयुक्त यांनी “सदर हॉटेल मालक व पीडित महिला कामगार, रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांना बोलावून योग्य पद्धतीने कार्यवाई करू, व पिढीत कामगार महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे तोंडी आश्वासन दिले आहे”.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे