देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाकडून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर विक्रमी मतांनी निवडून आले.
खरं तर निवडणुका, आल्यावर सर्वच उमेदवार नागरिकांना मी निवडून आल्यावर तुम्ही जे सांगाल ती कामे करीन अशी आश्वासने देतात पण निवडून आल्यावर ते होताना दिसत नाही. पण निवडणुकीत जो शब्द दिला, तो खरा करण्याचा प्रत्यक्ष अनुभव प्रभाग क्रमांक 13 मधील कानडे मळा येथे नागरिकांना आला. विजयी उमेदवारांना सत्कारासाठी बोलविले होते.
पण सत्काराच्या अगोदरच सर्वच विजयी उमेदवारांनी कानडेमळा येथे मारुती मंदिराचे भूमिपूजन केले. त्यामुळे परिसरातील मतदारांना ” आधी लगीन कोंढण्याच, मग रायबाचं! ” या वाक्याची जाणीव झाली, त्यामुळे प्रभागातील सर्व मतदार, नागरिक यांच्यामध्ये ” नगरसेवक असावे तर असे! अशा आनंददायक भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा