देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 18 फेब्रुवारी: टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भाने केलेल्या विधानावर राज्यभरात भारतीय जनता पक्षाने केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी तुलना केलेली नाही. पण सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. तरीही ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सपकाळ म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा