देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 17 डिसेंबर: कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय हे पूर्वीचे अहमदनगर व आताचे अहिल्यानगर मधील एक जुने आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे, जे प्रामुख्याने महिला आणि बाल आरोग्य सेवांसाठी ओळखले जाते, विशेषतः प्रसूतींसाठी या रुग्णालयाची एक खास ओळख आहे. हे रुग्णालय माळीवाडा भागात असून,ते अहिल्यानगर महापालिकेच्या अंतर्गत चालते.
या रुग्णालयात शहरातून व आजू बाजूच्या गावातून गोरगरीब रुग्ण येत असतात.
कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर, व कर्मचारी वर्गामुळे स्वछता, चांगल्या पद्धतीने राखली जाते, व रुग्णांना उत्तम सेवा देखील पुरविली जाते. पण या रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर व कामगार यांना गेल्या चार महिन्यापासून ठेकेदाराकडून पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली असल्याची विदारक माहिती देशस्तंभ न्यूजच्या समोर आली आहे. याबाबत देशस्तंभ न्यूज नेटवर्कने ‘कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मधील कंत्राटी डॉक्टर, कामगार यांच्यावर पगारा अभावी होतेय उपासमार! ठेकेदार तुपाशी कामगार मात्र उपाशी! कामगारांचे आर्थिक शोषण थांबणार का? अशा आशयची दि. 6 डिसेंबर रोजी बातमी कामगारांच्या बाजूने दिली होती.
या बातमीची ठेकेदाराने दखल घेत येथील कंत्राटी डॉक्टर, कामगारांचे अखेर पगार केले असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत येथील कंत्राटी कामगारांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नगर शहरातील नागरिकांमधून सुद्धा समाधान व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा