देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क दि. 13 जानेवारी :अहिल्यानगर शहरातील निवडणूक येत्या 15 जानेवारी ला होत आहेत. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार ), शिवसेना (शिंदे गट ), शिवसेना (उबाठा ), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) काँग्रेस या प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, याही पक्षांनी निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.गेल्या काही दिवसांपासून रॅली, चौक, सभा, जाहीर प्रचार सभा यांनी अहिल्यानगर शहर रंगले होते. जाहीर सभेतून एकमेकांवर टिका करत तोफा धडकत होत्या. आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या संक्रात आहे, व पतंग उत्सवही आहे, शहरातील मतदार तिळगुळ कोणाला देणार? कोणाचा पतंग कापणार? या चर्चा होत आहेत, एकंदरीतच अहिल्यानगर शहरातील मतदार कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देतात, हे महत्वाचे ठरणार आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा